Advertisement

आगामी थ्रिलर 'ए थर्सडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार माया सराओ!

आरएसवीपी मूव्हीजने आपल्या आगामी थ्रिलर 'ए थर्सडे'मधील माया सराओचा फर्स्ट लुक आणला समोर!

आगामी थ्रिलर 'ए थर्सडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार माया सराओ!
SHARES

आरएसवीपी मूव्हीजनं ब्लू मंकी फिल्म्ससोबत आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, 'ए थर्सडे' मधून आता माया साराओचा पहिला लुक प्रदर्शित केला. बेहज़ाद खंबाटा द्वारे दिग्दर्शित आणि लिखित, हा चित्रपट गुरुवारी होणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे. 

माया टेलीव्हिजनवर लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. माया सराओ एका गुलाबी रंगाच्या शर्टावर स्ट्रिपड ब्लेज़र मध्ये दिसत आहे. शॉर्ट हेयर कट आणि चेहेऱ्यावर असलेले गंभीर हावभाव तिच्या भूमिकेतला गंभीरपणा समोर आणतात. 

चित्रपटात एका बुद्धिमान प्ले स्कूल टीचर, नैना जयसवालची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही भूमिका यामी गौतम साकारत आहे आणि ती १६ मुलांचे अपहरण करते. पहिल्यांदाच यामी एक ग्रे व्यक्तिरेखा सकारात असून, नेहा धुपिया चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘ए थर्सडे’चे निर्माता, रोनी स्क्रूवाला आरएसवीपीच्या अंतर्गत याची निर्मिती करणार आहेत कारण ते नेहमीच नव्या संहिता आणि प्रतिभेच्या शोधात असतात. या चित्ताकर्षक थ्रिलरमध्ये नेहा धूपिया, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी, माया सराओ सारखे अनेक प्रतिभाशाली कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ज्यामध्ये यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहे. 

Advertisement

आरएसवीपी आणि ब्लू मंकी फिल्म्स द्वारे निर्मित ‘ए थर्सडे’, २०२१ मध्ये डिजिटल माध्यमात प्रदर्शित होणार आहे ज्याचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे.



हेही वाचा

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा