Advertisement

शिवसेनेचे युवराज भररात्री उतरले रस्त्यावर!


शिवसेनेचे युवराज भररात्री उतरले रस्त्यावर!
SHARES

मुंबईतील अनेक रस्त्यांची कामे दगडी खडी अभावी रखडलेली असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी रात्री अचानक पाहणी करण्यात आली. शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर आदी महापालिकेतील सेनापतींना सोबत घेऊन पश्चिम उपनगरातील रस्त्यांची पाहणी केली.

पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या मुंबईतील एस. व्ही. रोड, आर. के. मिशन रोड, वांद्रे लिंक रोड, खार सी. सी. रोड क्र. 13, जुहू तारा रोड, पवनहंस एस. व्ही. रोड, एन. एस. फडके रोड अंधेरी पूर्व आणि पश्चिम आदी रस्त्यांच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली.

मुंबईतील सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करायची आहेत. परंतु अनेक रस्त्यांची कामे खोदून ठेवली आहेत. पण दगडी खडी न मिळाल्यामुळे ती अर्धवटच पडून आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुखमत्र्यांना ट्विट करून याप्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली होती. परंतु मुखमंत्र्यांनी या ट्विटची दखलही घेतली नाही. त्यामुळे अखेर युवराजांना आपल्या महापालिकेतील सेनपतींसह रस्त्यावर उतरून कामांची पाहणी करावी लागली. या पाहणीत युवराज आणि सेनापतींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांना देता येत नव्हती, परंतु पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन मात्र त्यांनी दिले. आता हे आश्वासन खरंच पूर्ण होणार की नाही हे मात्र पावसाळा आल्यावरच कळेल. तोपर्यंत तरी या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याशिवाय मुंबईकरांकडे पर्याय नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा