Advertisement

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळाल्याचं शल्य- छगन भुजबळ

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी ​मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ​​​(status of elite language) मिळावा, यासाठी केंद्राकडे मागणी करावी, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलं.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळाल्याचं शल्य- छगन भुजबळ
SHARES

मराठी भाषेला अभिजात (Marathi language) दर्जा मिळावा यासाठी विधीमंडळात ठराव सादर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (status of elite language) मिळावा, यासाठी केंद्राकडे मागणी करावी, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलं.

हेही वाचा- सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा, न शिकवल्यास १ लाखांचा दंड

मराठी भाषेला अभिजात दर्जा (status of elite language) मिळावा यासाठी केंद्राकडे मागील १० वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. उलट १६ वर्षांपूर्वी तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा अभिजात आहे, हे सिद्ध करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्याचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली ५०० पानी अहवाल केंद्राकडे सादर केला. त्यानंतर केंद्राच्या समितीकडून ५ फेब्रुवारी २०१५ ला हा अहवाल मान्य करून पुढे पाठवण्यात आला. मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नसल्याचं भुजबळ यांनी यावेळी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिलं. 

Advertisement

कोणत्याही भाषेला अभिजात (status of elite language) दर्जा मिळवण्यासाठी ४ अटी आहेत. त्यामध्ये संबंधित भाषा १०००-१५०० वर्षे जुनी हवी, सदर भाषेचं साहित्य दर्जेदार असावं, सदर भाषा इतर भाषेची नक्कल नसावी, सदर भाषा आणि पाठपुरवठा करण्यात येणारी भाषा मूळ हवी. या चारही अटींची पूर्तता मराठी भाषा करते. एवढंच नाही, तर मराठी ही ७ वाणांची भाषा राहिलेली आहे. तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. यासाठी देशाच्या पंतप्रधानांना विनंती करण्याची गरज आहे. यासाठी राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी (all party members of Parliament) एकत्र यायला हवं, असं भुजबळ म्हणाले. 

Advertisement

हेही वाचा- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र

संत ज्ञानेश्वरांनी अमृताहूनही गोड अशी उपमा मराठी भाषेला दिली. मराठी भाषा २ हजार वर्षे जुनी असल्याचे सबळ पुरावे असतानाही आजवर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. याचं शल्य मराठी माणसाच्या मनात आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भुजबळ यांनी सभागृहात केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा