Advertisement

राधे माँच्या अडचणीत वाढ


राधे माँच्या अडचणीत वाढ
SHARES

सीएसटी - स्वयंमघोषित अाध्यात्मिक गुरू राधे माँ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहेत. राधे माँवर अनेक आरोप असतानाही भाजपा सरकार आणि मुंबई पोलीस तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप युनायटेड काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष असद पटेल यांनी केला. असद पटेल मुंबई पोलीस आणि सरकारविरोधात येत्या 2 फेब्रुवारीला अंधेरी कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. 29 मार्च 2016 ला राधे माँला विमानातून त्रिशूल घेऊन जाताना पाहिले होते. त्याचक्षणी सहार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेलो असता पोलिसांनी सहकार्य केले नाही. उलट सहारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी धमकी दिली आणि तक्रार मागे घ्यायला सांगितल्याचा आरोप असद पटेल यांनी केला.

राधे माँने चक्क विमानात त्रिशूल घेऊन प्रवास केला होता. त्याची तक्रार देखील युनायटेड पार्टीचे अध्यक्ष असद पटेल यांनी सहार पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी राधे माँ जामिन मिळवण्यासाठी कोर्टात जाणार आहे. याला विरोध करणार असल्याचा इशारा असद पटेल यांनी दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा