सोशल मीडियावर सध्या नितेश राणे यांचा संघाच्या गणवेषातील फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर संघाची ध्येयधोरणं समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची प्रतिक्रिया राणे यांनी दिली.
नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकणवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. नितेश भाजपकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले असले, तरी शिवसेनेनं त्यांच्या विरोधात सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळं त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच भाजपचे कार्यकर्ते आपल्याला खरोखर मदत करतील का, याबाबत त्यांना शंका आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयदशमी उत्सवात सहभागी झाले होते. त्यानंतर टीकाकारांना उत्तर देताना
जे मला ओळखतात, ते मला ट्रोल करणार नाहीत,' असंही ते म्हणाले.'भाजपची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो,' असा खुलासा त्यांनी केला.
हेही वाचा-
राष्ट्रवादी नाही, तर शिंदे स्वत:च थकलेत- अजित पवार
माॅब लिंचिंग हा संघविचाराचाच भाग, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची 'आरएसएस' प्रमुखांवर टीका