मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत कोण लागून गेली? आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी मुंबई पोलिसांची बाजू घेत अभिनेत्री कंगना राणावत हिला सुनावलं आहे. (bjp leader nilesh rane slams actress kangana ranaut over defamation of mumbai police)
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींसोबतच कंगना राणावत मुंबई पोलिसांनाही सातत्याने लक्ष्य करत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे आपल्या ट्विटर हँडलवरुन म्हणाले, अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत. पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.
हेही वाचा- रणवीर, रणबीरच का? आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा, भाजप नेत्याची मागणी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनची चर्चा सुरू झाल्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग माफिया यांच्यातील संबंध चव्हाट्यावर आणण्याची तयारी कंगना राणावत हिनं दाखवली होती. त्यावर कंगनाला संरक्षणाची गरज आहे. मात्र, तिनं माहिती देण्याची तयारी दाखवून ४ दिवस उलटूही महाराष्ट्र सरकारनं तिला संरक्षण दिलेलं नाही, असं म्हणत भाजप आमदार कदम यांनी कंगनाला संरक्षण देण्याची मागणी केली होती.
त्यावर राम कदम यांचे आभार मानताना, सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद. खरंतर गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज, असं कंगना म्हणाली होती.
हेही वाचा- ती व्यक्ती मुलींसाठी धोकादायक! काँग्रेसचा कंगनाला सल्ला