शुक्रवारी भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सर्वात जास्त हवा होती ती म्हणजे भाजपकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीची...वांद्रे-खेरवाडीपासून ते थेट वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत भाजपनं ही बॅनरबाजी केली होती..मुंबई लाईव्हने बॅनरबाजीवर वृत्त प्रकाशित केलं होतं. यात कोर्टाच्या सक्त आदेशांनंतरही सत्ताधारी भाजपनेच केलेल्या बॅनरबाजीवर बोट ठेवलं होतं. मुंबई लाईव्हने हे वृत्त दिल्यानंतर शुक्रवारी हा विषय चर्चेचा ठरला..अखेर शनिवारी भाजपचे हे सर्व बॅनर काढण्यात आले...मात्र अशा प्रकरणांमध्ये कारवाई होत नसल्याचा अनुभव सामाजिक कार्यकर्ते सांगतात..