काँग्रेसमध्ये २ दिवसांपूर्वी प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रवेशादरम्यान तिला या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
उर्मिलाचा सामना विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. पक्ष प्रवेशादरम्यान आपण केवळ निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नसून निवडणुकीनंतरही काँग्रेससोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदानं उत्तर मुंबईत उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ साली गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. गोपाळ शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. उर्मिलाच्या काँग्रेस प्रवेशानंतर हा शोध थांबला.
हेही वाचा -
राजकारणात उतरून बदल घडवायचाय, उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित अमित शहा भरणार अर्ज