राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना खोकला आणि ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोरोना टेस्ट (corona test) करण्यात आली. ही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून पुढील ४ दिवस घरूनच काम करणार असल्याची माहिती देशमुख (medical education minister amit deshmukh) यांनी दिली.
प्रकृती ठिक
अमित देशमुख यांना खोकला आणि ताप (cough and fever) आल्याने कोविड-१९ चाचणी करून घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी त्यांना दिला होता. त्यानुसार जे.जे. रुग्णालयातील फिवर क्लिनिक (fever clinics) इथं वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार यांच्या सहकाऱ्यांमार्फत मंगळवारी देशमुख यांची चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट नेगेटिव्ह (corona test)आले आहेत. आपली प्रकृती ठिक असून काळजीचं कारण नाही. आणखी ४ दिवस घरून काम पाहणार आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल, असं देशमुख यांनी सांगितलं.
वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने कार्यरत असताना आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने आपण ही चाचणी करून घेतली, असं अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - आता, आमदारकीही भिकेत मिळाली, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
फिव्हर क्लिनिकची सोय
राज्य शासनाने ठिकठिकाणी फिवर ओपीडी सुरू केली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून कोरोना तपासणीची सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असतील त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन कोरोना तपासणी करून घ्यावी. आजार लवकर लक्षात आल्यास लवकर उपचार करणे आणि लवकर बरं होणं शक्य असल्याने अधिकाधिक लोकांनी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
डाॅक्टरांचा सल्ला घ्या
महाराष्ट्र शासनाकडून कोविड -१९ संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कोविड -१९ तपासणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. याचा विस्तार आणि व्याप्ती वाढविण्याचं काम सुरू आहे. आपल्यात लक्षणे दिसत असतील, तर कोविड-१९ संदर्भातील हेल्पलाईनला संपर्क करा, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चाचणी करून घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी केलं आहे. आपले आई-वडील, कुटुंब आणि शेजारी यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी आपणाला घ्यायची आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग मदतीसाठी तत्परतेने आपल्या सेवेत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आजवर सर्वांनी चांगली साथ दिली आहे, ती यापुढेही ती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून राज्यात शेवटचा रूग्ण असेपर्यंत कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच राहील, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - माझ्या घराची रेकी, माझी हत्या करण्याचंही ठरलंय, आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ