माझगाव - काँग्रेसचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यावतीनं दारुखाना येथे बुधवारी नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलीय. नगरसेवक निधीतून हे काम केलं जात आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. पाईप लाईन बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांच्यावतीनं मनोज जामसुतकर यांचा सत्कार करण्यात आला.