Advertisement

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात जो काही निर्णय घेतील त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मान्य असेल.

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल असं सांगितलं. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलं, त्यामुळे महायुतीच्या  मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो निर्णय मान्य असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र विधान सभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Election esult 2024) झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण (Maharashtra CM) होणार याची उत्सुकता देशासह महाराष्ट्राला लागली होती. अखेर निकालाच्या चार दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. 

एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, ही सर्वात मोठी व्हिक्टोरी आहे, महायुतीचा विश्वास, विकास कामे जी महाविकास आघाडीने थांबवली ती आम्ही सुरू केली, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. 

मोठ्या प्रमाणावर हा विजय जनतेचा आहे, निवडणुकीच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. रात्रभर काम करायचो, 2 3 तास झोपायचो आणि पुन्हा काम करायचो. मी मोजल्या नाहीत पण 70-80 सभा घेतल्या. मी आधी देखील कार्यकर्ता म्हणून काम केले पुढे देखील करेन. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी देखील सर्व सामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलो आहे. 

लाडके भाऊ, शेतकरी, लाडक्या बहिणी अशा सर्वांसाठी काही ना काही करायचे होते. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना ते कसे कळणार. 

एक को सिस्टिम तयारी झाली, घरातील सर्वांना काही न काही मिळणार हे तयार केले, सरकार म्हणून काय करणार अजून? मी आनंदी आहे, खुश आहे. 

केंद्रातून मोदी शाह साहेबांचे पूर्ण पाठबळ आम्हाला होते. मला ते दिवस आठवतात जेव्हा मला मुख्यमंत्री करत होते. 

आम्ही सर्व प्रश्न सोडवले, काहीच ठेवले नाहीत, .राज्याच्या प्रगतीचा वेग बघा, राज्य एक नंबरला नेण्याचा काम आम्ही केले. मागच्या अडीच वर्षात राज्य तिसऱ्या नंबरला गेले. आम्ही आल्या आल्या ते पहिल्या नंबरला आणले.  

लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते, मी समाधानी आहे, 

आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे लोक आहोत. माझ्या रक्ताचा शेवटच थेंब असे पर्यंत मी जनतेसाठी काम करेन. मी जीव तोडून काम केलं, त्यामुळेच हे यश प्राप्त झालं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं ते महत्त्वाचं आहे. 


हेही वाचा

मनसे चिन्ह गमावणार?

देवेंद्र फडणवीस यांचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा