Advertisement

महाशक्ती आघाडीची पहिली यादी जाहीर

दोन जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत.

महाशक्ती आघाडीची पहिली यादी जाहीर
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या विधानसभा निवडणुकीचे (election) वारे वाहत आहेत. सर्व पक्ष कसून मेहनत घेत आहेत. अशातच आता अनेक पक्ष आपली उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. अशातच आता परिवर्तन महाशक्ती आघाडीने आपली 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

जाहीर केलेल्या यादीत एकूण 8 जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, तर दोन जागा राजू शेट्टींच्या (raju shetty) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.

राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवर्तन महाशक्ती आघाडीने अचलपूरमधून बच्चू कडू (bacchu kadu) यांना उमेदवारी दिली आहे. तर रावेरमधून अनिल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय शिरोळ आणि मिरज या दोन जागां स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. मात्र, या जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा