मुंबईतील माहुल येथील प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचं पालन करून तेथील उद्योग आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा आणि त्यातून माहुल परिसरातील प्रदूषण नियंत्रण करावं, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधीतांना दिल्या. (follow NGT orders and control pollution in mahul mumbai orders maharashtra environment minister aaditya thackeray)
माहुल, मुंबई येथील प्रदूषण समस्येबाबत आयोजित बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे, माहुल परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, मुंबई महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, माहुल येथील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तेथील उद्योगांनी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे. माहुल भागातील उद्योगांनी पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पूर्तता पुढील काही दिवसात करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित लवाद यांनी सूचना दिलेल्या आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, प्रदूषण नियंत्रणासाठीच्या विविध आवश्यक उपाययोजना राबवून माहुल येथील प्रदूषण नियंत्रित करुया. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचं रक्षणही आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
यावेळी माहुल येथील प्रदूषण नियंत्रणासाठी व राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याबाबतीत माहिती देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी माहुल गावातील वायू प्रदूषणाचं संकट पाहून बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना २८६ कोटी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला होता. माहुल गावातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी या दंडातून रक्कम खर्च करण्याचे निर्देश एनजीटीने दिले होते.
माहुल गावात प्रदूषण करणाऱ्या ४ कंपन्यांना २८६ कोटींचा दंड
माहुलमध्ये विलगीकरण केंद्र उभारण्यास हायकोर्टाची परवानगी, पण...