Advertisement

अडथळ्यांच्या शर्यतीवर अरविंद सावंत करतील का मात?


अडथळ्यांच्या शर्यतीवर अरविंद सावंत करतील का मात?
SHARES

१९९६ साली भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांचा विजय हा एक अपवाद सोडला. तर दक्षिण मुंबई या मतदारसंघावर काँग्रेसनेच वर्चस्व राखलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे मुरली देवरा ४ वेळा, तर मिलिंद देवरा २ वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यामुळे हा देवरा कुटुंबाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २०१४ साली झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये हा मतदारसंघ थेट शिवडीपर्यंत पोहचल्याने शिवसेनेची ताकद या भागात वाढली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत निवडून आले. यंदाही हे प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे असून यावेळी या मतदारसंघातील जनता कुणाला कौल देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सावंत यांची लढत काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यासोबत होणार आहे.

गटप्रमुख ते खासदार 
१९६८ साली गटप्रमुख म्हणून कारकिर्द सुरु केलेल्या अरविंद सावंत यांनी सीमा आंदोलनात १९६९ साली महत्वाची भूमिका बजावली. अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्ते असल्यामुळे शिवसेनेत अरविंद सावंत हळूहळू मोठ्या पदावर पोहोचले. ३० वर्षांपासून ते महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे अध्यक्ष आहेत. देशातील ‘सर्वोत्कृष्ट युनियन लीडर’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. फेम इंडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा ‘श्रेष्ठ सासंद पुरस्कार खासदार अरविंद सावंत’ नुकताच प्रदान करण्यात आला आहे. या ५ वर्षांत खासदार अरविंद सावंत यांची संसदेतील उपस्थिती ९८ टक्के होती. त्यांनी संसदेतील २७९ चर्चेत सहभाग घेतला. तर मतदारसंघ आणि इतर मुद्यांवर संसदेत सर्वाधिक ४६३ प्रश्न विचारले. त्यांच्या खासदार निधीतील २५ कोटींपैकी त्यांनी १५ कोटी मतदारसंघातील कामासाठी त्यांनी खर्च केले आहेत. तर अजूनही ३ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.

मतदारसंघाचा इतिहास
दक्षिण मुंबई मतदारसंघ एकेकाळी अस्सल मराठमोळा परिसर होता. तर मुस्लिमांची मते निर्णायक ठरत होती. फेररचनेमध्ये हा मतदारसंघ थेट शिवडीपर्यंत जाऊन पोहोचला. लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता दक्षिण मुंबई मतदारसंघावर काँग्रेसनेच वर्चस्व राखलं आहे. काँग्रेसचे मुरली देवरा ४ वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहे. १९८० च्या पोट निवडणुकीत पहिल्यांदा मुरली देवरा हे संसदेत निवडून गेले. पुढे १९८९ आणि १९९१ अशा दोन्ही लोकसभेच्या निवडणुका देवरा यांनी जिंकल्या. त्यानंतर मात्र १९९६ मध्ये देवरा यांना भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी हरवलं. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मुरली देवरा यांनी त्याचा मुलगा मिलिंद यांना निवडणुकीत उतरवलं. या मतदार संघातून पुढे मिलिंद देवरा हे सलग १० वर्ष खासदार राहिले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांचा युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी १ लाख २८ हजाराच्या मताधिक्याने पराभव केला.

उद्धव आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत थेट पोहोचणाऱ्या नेत्यापैकी एक आहेत. शिवसेनेत १९६८ पासून कार्यरत असलेले अरविंद सावंत यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेड कामगार महासंघ आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष बनवले होते. त्याच बरोबर सावंत यांनी शिवसेना नेते आणि प्रसारमाध्यमांपुढे प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू सतत मांडत असल्यामुळे उद्धव ठाकरेच्या मर्जीतले नेते म्हणून त्यांची पक्षात विशेष ओळख आहे.


#MLviews

महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी यंदाची लढत सोपी नसेल. यामागचं कारण म्हणजे गेल्या निवडणुकीत सावंत मोदी लाटेत सहजपणे निवडून आले होते. परंतु यावेळेस जागोजागी सावंत यांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. कोस्टल रोड प्रकल्प असो, शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेजवळील हिमालय पूल दुर्घटना असो किंवा बीडीडी चाळकऱ्यांचा प्रश्न, सर्वच ठिकाणी त्यांना टिकेचा सामना करावा लागला आहे. त्याउलट दक्षिण मुंबईतील सर्व स्तरातील मतदारांमधून देवरा यांना वाढता पाठिंबा आहे. मनसेचाही त्यांना सपोर्ट मिळतोय.



हेही वाचा-

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रिया दत्त यांचा निर्णय ठरेल का याेग्य?

एकनाथ गायकवाड यांना सर्वसामान्य जनतेची मिळेल का साथ?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा