Advertisement

इंच इंच जमीन महाराष्ट्राची सांगणारे आता, भूखंडाचं श्रीखंड तर खाणार नाही ना?- आशिष शेलार

या जागेची घोषणा करतानाच सरकार ५० हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करतंय का? असा सवाल आम्ही त्यावेळी केला होता, हा अंदाज खरा ठरत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

इंच इंच जमीन महाराष्ट्राची सांगणारे आता, भूखंडाचं श्रीखंड तर खाणार नाही ना?- आशिष शेलार
SHARES

ठाकरे सरकारने मेट्रो ३ आणि मेट्रो ६ मार्गाच्या कारशेडसाठी प्रस्तावित केलेली कांजूरमार्ग येथील जागा वादग्रस्त असून गारोडीया समूहाने या जागेवर दावा सांगितला आहे. या जागेची घोषणा करतानाच सरकार ५० हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करतंय का? असा सवाल आम्ही त्यावेळी केला होता, हा अंदाज खरा ठरत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आशिष शेलार (ashish shelar) यांनी सांगितलं की, गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावून कांजूर खेड्यातील ५०० एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवा. तसंच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या १००एकर जमिनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे.

हेही वाचा- मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क

मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने १६ एप्रिल २०१६ ला या जागेबाबत जैसेथे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीयांनी केलाय. इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या "सातबारा" आडून भूखंडाचा श्रीखंड तर खाणार नाही ना? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना?

कांजूरमार्गच्या जागेचा निर्णय घेत असताना तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरणातील ५० हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय? असा सवाल आम्ही केला. तेच खरं ठरतंय. पेटवायची अस्मिता, खायची मालमत्ता? मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा "मेट्रो कारनामे!", अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग इथं सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं काम ताबडतोब थांबवा. कारण या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं होतं.

(maha vikas aghadi government trying 50 thousand crore rupees corruption in kanjurmarg land alleges bjp mla ashish shelar)

हेही वाचा- कांजूरमार्गला कारशेड हलवून ‘हे’ प्रश्न सुटणार का?- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा