Advertisement

गुन्हा रद्द करण्यासाठी जानकरांचे प्रयत्न


गुन्हा रद्द करण्यासाठी जानकरांचे प्रयत्न
SHARES

मुंबई - गडचिरोलीमधील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी अडचणीत आलेले दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा रद्द करण्यासाठी महादेव जानकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतलीय. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. काँग्रेसचा अर्ज बाद करा, मोटवानी तुमच्याकडे अर्ज घेऊन येतील त्यांना कपबशीचे चिन्ह द्या अशा शब्दांमध्ये जानकर या व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसत होते. मी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बोलतो आहे असेही महादेव जानकर या व्हिडियोमध्ये सांगताना दिसत होते. जानकरांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि विरोधक सरकारवर तुटुन पडले. हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा