ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे. पडळकर येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार असून ते भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा मी राजीनामा देत आहे. आजपासून मी वंचितचं काम बंद केलं आहे. दोन दिवसांत माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. सर्व पक्षांकडून मला ऑफर आहे, असं ते म्हणाले.
पडळकर लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वाधिक मते मिळाली होती.
धनगर समाजाचे नेते अशी गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून भाजपमध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. पण पक्षातील काही नेत्यांसोबत बिनसल्याने ते पक्षातून बाहेर पडले होते. ते पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा-
वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, हे आहेत २२ उमेदवार
एमआयएमची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत मुंबईतील ५ उमेदवार