Advertisement

सरकार कधीही हवेत विरून जाईल - अशोक चव्हाण


सरकार कधीही हवेत विरून जाईल - अशोक चव्हाण
SHARES

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या ७ दिवसांत ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल, हे कळणारही नाही, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. खा. चव्हाण टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.


जाचक अटी, शर्ती

चव्हाण पुढे म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. यावरून शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास नाही हे स्पष्ट झाले आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे की, कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घालत आहे ? या सरकारचा कारभार पाहता हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे, असे दिसते असेही ते म्हणाले.


संघर्ष यात्रेचे यश

विरोधी पक्ष, सुकाणू समितींवर मुख्यमंत्र्यांकडून ज्या भाषेत टीका होत आहे, त्यातून सत्तेचा अहंकार दिसून येतो. त्यातही तीन महिने झाले तरी मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेवर टीका करावी लागते यातच सर्व काही आले. गेली अडीच वर्ष कर्जमाफी देणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संप करावा लागला. संघर्ष यात्रेचे यश संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. भाजपाच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते ? आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला ते मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेस पक्षाने कर्जमाफीचे खोटे आकडे आणि सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर उघडा पाडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा त्रागा सुरु आहे. अजूनही वेळ गेली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, शेतकऱ्यांना न्याय द्या. अन्यथा शेतकरी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे असे अशोक चव्हाण म्हणाले.



हे देखील वाचा -

'दलबदलू' सत्तेशिवाय राहू शकत नाहीत - अशोक चव्हाण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा