डाक विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Maharashtra Governor donates ₹1 lakh for treatment of postal staff affected by COVID-19) यांनी १ लाख रुपयांचं वैयक्तिक मदत केली. राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिशचंद अग्रवाल यांनी राजभवन इथं राज्यपालांकडून १ लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश स्वीकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झालं होतं.
“प्रिय बापू आप अमर है” या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा व “आंतरदेशीय पत्र” या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली. स्पर्धेत ८०,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती डाकसेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवा, बलात्कार थांबतील- भगतसिंग कोश्यारी
६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय डाक विभागाच्या वतीने मुंबईपेक्स या दूर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते, त्यावेळी पत्र लेखन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल डाक विभागाचे कौतुक करताना या स्पर्धेत आपण स्वत: सहभागी होऊ असं राज्यपालांनी जाहीर केलं होते. त्यानुसार त्यांनी आंतरदेशीय पत्रावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर निबंध लेखन करुन स्पर्धेत पाठविला होता.
त्यानंतर मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी सी जगताप व सहाय्यक अधिक्षक एस डी खरात यांनी राज्यपालांची राजभवन इथं भेट घेऊन त्यांना प्रथम पुरस्काराचा २५ हजार रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला. ही रक्कम आणि स्वतःचे वैयक्तिक ७५००० रुपये जोडून १ लाख रुपयांची ही रक्कम डाक विभातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी डाक विभागाला देणार असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलं होतं.
हेही वाचा - कदाचित राज्यपालांना आॅक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान- शरद पवार