Advertisement

दहिसर : EVM मशीन मध्ये घोळ असल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप

दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार विनोद घोसाळकर आणि मनसेचे राजेश येरुणकर यांच्यात मोठी लढत झाली होती.

दहिसर : EVM मशीन मध्ये घोळ असल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप
SHARES

दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) उमेदवार राजेश येरुणकर यांनी मतमोजणी (counting) आणि ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते राहत असलेल्या परिसरातील मतदार यादीतून त्यांना फक्त दोन मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. 

त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मतदान (voting) केले नाही, आई आणि पत्नीनेही मला मतदान केले नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या (bjp) विद्यमान आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे (shiv sena) (उद्धव ठाकरे) उमेदवार विनोद घोसाळकर आणि मनसेचे राजेश येरुणकर (rajesh yerunkar) यांच्यात मोठी लढत झाली.

मनिषा चौधरी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांना 58,587 मते मिळाली. घोसाळकर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 54,258 मते मिळाली. येरुणकर यांना 5 हजार 456 मते मिळाली आहेत.

मात्र, येरुणकर स्वत: राहत असलेल्या भागातील मतदार यादीतील मतदान केंद्रावरील एक हजार मतदारांपैकी केवळ दोनच मते येरुणकर यांना मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत येरुणकर यांनी मतमोजणी केंद्रावरच याबाबत आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्याचे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे न ऐकून आम्हाला अटक करण्याचे आदेश दिले.म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो.

माझ्या घरात मी, माझी पत्नी, मुलगी आणि आई असे चार मतदार आहेत. माझ्या कुटुंबाने मला मतदान केले नाही का, असा सवाल येरुणकर यांनी केला आहे.

काही उपकरणांची बॅटरी 99 टक्के भरलेली असताना काही उपकरणांची बॅटरी डिस्चार्ज कशी होते, असा प्रश्नही येरुणकर यांनी उपस्थित केला.

दहिसरमधील काही वसाहतींमध्ये चौधरी यांच्याविरोधात असंतोष होता, तिथे मतदारांनी त्यांना प्रचारही करू दिला नाही. चौधरी यांना त्या मतदारसंघात बहुमत कसे मिळाले, असा सवालही येरुणकर यांनी केला आहे.



हेही वाचा

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

वसई-नालासोपारा : हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा पराभव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा