उत्तर प्रदेशातील हाथरस इथं घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारादरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज तुटून का पडत नाहीयेत? त्यांना जाब का विचारला जात नाहीये? असा रोकठोक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. (mns chief raj thackeray reacts on uttar pradesh hathras gang rape case)
हाथरस घटनेवर भाष्य करताना आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस इथं घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारादरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं, उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले...
#HathrasHorror #संतापजनक pic.twitter.com/qfPZtOlIBH
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2020
बरं समजा, त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज तुटून का पडत नाहीयेत? त्यांना जाब का विचारला जात नाहीये? असा संताप देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
हाथरसमधील ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढं शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलंच पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी या घटनेवर केंद्र सरकारने कडक भूमिका घेण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
हेही वाचा - ‘ब्रँड ठाकरे’असला, तरी…