विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) आणि उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) शिवसेना गटाला (shiv sena ubt) मोठा पराभव सहन करावा लागला. निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे सर्वात कमी आमदार निवडून आले. तर, मनसेला खातेही उघडता आले नाही.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही विजय मिळवता आला नाही. अशातच ठाकरे बंधुंच्या हितचिंतकांची, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर काही लोकांनी दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनरही लावले होते.
परंतु, या चर्चेवर दोन्ही भावांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरीही रविवारी 23 फेब्रुवारी रोजी रात्री ठाकरे बंधू समर्थकांसाठी एक सुखद चित्र पाहायला मिळाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र दिसले. यावेळी दोघेही बोलत आणि हसत देखील होते. एका लग्न समारंभावेळी हे ठाकरे बंधू एकत्र (meeting) आले होते. मुंबईतील अंधेरी इथे हा लग्न सोहळा पार पडला. SRA सीईओ डॉ. महेंद्र कल्याण यांचे सुपुत्र कौस्तुभ कल्याणकर यांच्या लग्नाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते.
उद्धव यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि राज यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगली चर्चा झाल्याचेही दिसून आले.
त्यांच्या या भेटीनंतर मात्र आता चर्चांना उधाण आले आहे. हे दोन्ही भाऊ आता मराठी माणसांसाठी एकत्र येतील का? असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.
गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधूंची 3 वेळा भेट झाली आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी, राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नाला उपस्थित होते.
त्यानंतर, 22 डिसेंबर 2024 ला उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहिणी जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नालाही हजेरी लावली. दादर येथील राजे शिवाजी विद्यालयात हा विवाह सोहळा पार पडला होता.
या लग्नासाठी ठाकरे कुटुंब एकत्र जमले होते आणि आता म्हणजे 23 फेब्रुवारी 2025 रोजी अंधेरी येथे SRA सीईओ डॉ. महेंद्र कल्याण यांचे सुपुत्र कौस्तुभ कल्याणकर यांच्या लग्नात ठाकरे बंधू (thackeray brothers) भेटले.
हेही वाचा