मंदिराच्या कामात घोटाळा करुन स्वतःचे खिसे भरण्याचा धंदा भाजपने सुरु केला आहे, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सोबतच काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील नाना पटोले यांच्या भाषणाची क्लीप देखील अपलोड केली आहे.
आधी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करत राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि आता त्याच मंदिराच्या कामात घोटाळा करुन स्वतःचे खिसे भरण्याचा धंदा भाजपने सुरु केलाय. मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने निर्लज्जपणाच्या साऱ्या मर्यादाच ओलांडल्यात!, असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे.
तर, नाना पटोले यांनी विधानसभेत राम मंदिरासाठी पैसे गोळा करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. चॅरिटी अॅक्टच्या अशा कुठल्या कायद्याच्या आधारे राम मंदिरासाठी पैसे गोळा केले जात आहेत. प्रभू रामचंद्रांनी यांना राम मंदिरासाठी पैसे गोळा करण्याचं कंत्राट दिलं होतं का? महाराष्ट्रात रामाच्या नावाने पैसे गोळा करणारे हे कोण आहेत?, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. तोच मुद्दा काँग्रेसने पुन्हा उपस्थित केला.
हेही वाचा- राम मंदिर वर्गणी: राऊतांच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांचं टीकास्त्र
आधी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करत राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि आता त्याच मंदिराच्या कामात घोटाळा करुन स्वतःचे खिसे भरण्याचा धंदा भाजपने सुरु केलाय.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 14, 2021
मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने निर्लज्जपणाच्या साऱ्या मर्यादाच ओलांडल्यात!#BJP_का_श्रीराम_को_धोखा pic.twitter.com/SXXuN3gdwM
जनता सध्या भाजपा सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बुथ स्तरावर काम करा आणि गावखेड्यात काँग्रेसचा विचार पोहचवा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन इथं पार पडली. यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस विचाराचे सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने काम केलं पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणाऱ्या काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असं आवाहन देखील नाना पटोले यांनी यावेळी केलं.
(nana patole criticized bjp over ram mandir land corruption and donation)