धारावी - उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार धारावी विधानसेभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपात, 6 महिन्यांसाठी आहेत. ६ महिन्यांत युवा कार्यकर्त्यांचं कामकाज पाहून त्यांना कायम ठेवता येईल का, याबाबत निर्णय घेण्यात येईल. युवासेना धारावी विधानसभा क्षेत्रासाठी उपविभाग युवा अधिकारी म्हणून अज्जु शंकराप्पा, विधानसभा चिटणीस म्हणून शशिकांत विश्वकर्मा आणि विनोद डोईफोडे, समन्वयक म्हणून चेतन सूर्यवंशी आणि रमेश नाडार तर शाखा युवा अधिकारी म्हणून शाखा क्रमांक 176साठी निखिल कांबळे, 177साठी सागर बोबडे, 178 साठी राजेंद्र शिंदे, 179साठी के पार्थिबन नाडार, 180साठी अमोल चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.