Advertisement

नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

संतोष परब हल्ल्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली आहे.

नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
SHARES

संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी न्यायालयात हजर केलं गेलं. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्यानं त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं.

आमदार नितेश राणेंना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं. तर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे सुमारे तीन आठवडे अज्ञातवासात राहून अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. देशातील सर्वोत्तम वकिलांची फौजही त्यासाठी झटत होती.

मात्र, पोलिसांकडे असलेले पुरावे आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेता ही लढाई यशस्वी होणार नाही, असे दिसू लागताच नितेश यांनी उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज मागे घेतला़. तसंच ते न्यायालयाला शरणही आले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.



हेही वाचा

Bmc Election 2022: राष्ट्रवादी कॉंग्रेसही स्वबळावर लढणार मुंबई महापालिका निवडणूक

अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काहीच नाही, भाजपची टीका

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा