नियमित वेतन मिळत नसल्याने आर्थिक हालाखीला कंटाळून जळगाव येथील एसटी बस कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी यासाठी ठाकरे सरकारला जबाबदार ठरवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नसलेल्या वेतनप्रश्नावर टीका करताना ‘या’ आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, वेतन न मिळाल्याने २ एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या, या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणार्या घटना आहेत. एसटी कर्मचार्यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही २ कुटुंब उघड्यावर आली आहेत.
हेही वाचा- एसटी बस कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवलं जबाबदार
आता तरी सरकारने (thackeray government) जागं व्हावं. एसटी कर्मचार्यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एसटी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनोज चौधरी जळगावमधील कुसुम्बा गावातील रहिवासी होते. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असं मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.
(opposition leader devendra fadnavis slams thackeray government over st bus conductor suicide)
हेही वाचा- फडणवीस सरकारने केली मुंबईकरांची फसवणूक- सचिन सावंत