मालाड - राजकारणात शत्रुत्व कायम टिकत नाही याचा प्रत्यय सध्या मालाडकरांना आलाय. वॉर्ड क्रमांक 43 मध्ये शिवसेनेचे भौम सिंह राठोड आणि 2012 मध्ये आरपीआयचे उमेदवार पोपट घनवट हे दोघे एकेकाळी कट्टर शत्रू होते. पण त्यांच्या या शत्रुत्वाचे मैत्रीत रूपांतर झाले आहे. यावर्षी पालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे उमेदवार भौम सिंह राठोड उभे राहिले आहेत. यांच्यासोबत पोपट घनवट निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरलेत. यापूर्वी आमच्यात जो काही वाद होता तो राजकारणामुळे होता, असे भौम सिंह यांनी म्हटले आहे. तर आता एकत्र येऊन आम्ही शिवसेनेला विजयी करू असे पोपट घनवटने स्पष्ट केले आहे.