Advertisement

'राज्य सरकारकडे शिवस्मारकासाठी पैसेच नाहीत'


'राज्य सरकारकडे शिवस्मारकासाठी पैसेच नाहीत'
SHARES

मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, या प्रकल्पांसाठी सरकारकडे पैसाच नाही, भाजप सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. सरकारला शिवस्मारक हे बांधायचेच नाही, ते केवळ तोंडाला येईल ते बोलत आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी नोटाबंदी, राममंदिर, अरबी समुद्रातील शिवस्मारक, मेट्रो अशा विविध मुद्दयांवरून भाजप सरकारवर निशाणा साधला. शिवस्मारकाचे भूमिपूजन केवळ मतांसाठी केले जात आहे. शिवस्मारकाचा खर्च गड-किल्ल्यांवर करा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा भव्य शिवस्मारक यांना उभारायचे आहे. या नेत्यांना शिल्पनिर्मिती किंवा एवढा मोठा पुतळा उभारताना येणाऱ्या समस्यांची कोणतीही जाण नाही तसेच राम मंदिर उभारता येत नाही म्हणून स्टेशनला नाव दिले आहे. तसेच भाजपाची राम मंदिर निर्माणाबाबतची भूमिका बदलली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाल्याने येथील रोजगारांत स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात यावे. हल्ली कोणीही उठतो आणि कोर्टात जातो. मोदींना देश समजणे कठीण जात आहे तर कोर्टाला कसे समजावणार ? असे म्हणत राज ठाकरेंनी मोदी आणि न्यायालयावरही टीका केली. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा पूर्णपणे फसलेला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणादरम्यानच्या नरेंद्र मोदी यांच्या देहबोलीवरून ते स्पष्टपणे जाणवत होते, असे राज यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा