Advertisement

मुंबई पाकिस्तानात आहे का? दूध रोखून दाखवाच - चंद्रकांत पाटील


मुंबई पाकिस्तानात आहे का?  दूध रोखून दाखवाच - चंद्रकांत पाटील
SHARES

दुधाला २७ रुपये प्रति लिटर हमीभाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी १६ जुलैपासून मुंबईचं दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. राजू शेट्टींच्या या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई ही पाकिस्तानात आहे का? मुंबईचं दुध रोखून दाखवाचं, असं प्रतिआव्हानच पाटील यांनी शेट्टींना दिलं आहे. त्यामुळं आता दुधाच्या हमी भावावरून सुरू झालेलं आंदोलन आणखी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.


अध्यादेशाची अंमलबजावणी नाही

दुधाला प्रतिलिटर २७ रुपये प्रतिलिटर दर देण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला खरा. पण या अध्यादेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. त्यामुळं दूध उत्पादकांना केवळ १७ रुपये प्रतिलिटर इतकाच दर मिळत असून त्यामुळं त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळं दुधाला २७ रुपये प्रतिलिटर हमीभाव त्वरीत मिळावा या मागणीसाठी शेट्टी यांनी १६ जुलैपासून आंदोलनाची हाक दिली आहे.

१६ जुलैपासून दुधबाणी ?

या आंदोलनाअंतर्गत १६ जुलैपासून मुंबईचं दूध रोखण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. मुंबईत कोणत्याही मार्गे एकही थेंब दूध येणार नाही, त्यासाठी मुंबईला येणारे सर्व महामार्ग रोखून धरू असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. शेट्टी यांच्या या इशाऱ्यामुळं मुंबईत १६ जुलैपासून दुधबाणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतं आहे.


आंदोलन शांततेत करा

शेट्टी यांच्या या इशाऱ्याला अाव्हान देत पाटील यांनी नुकतंच कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबई पाकिस्तानात नाही, दूध रोखूनच दाखवा असं म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा हक्क आहे. पण हे आंदोलन शांततेत करावं. त्यासाठी भाजीपाला, शेतमाल आणि दुधाचं नुकसान का म्हणून करावंस असा प्रश्न करत त्यांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करावं असा सल्लाही दिला आहे. त्यामुळं आता १६ जुलैला नेमकं काय होतं याकडं मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा - 

सत्यासमोर सरकारला झुकावं लागलं - विखे पाटील

स्वातंत्र्याच्या लढाईत ख्रिश्चन इंग्रजांच्या बाजूने, खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा