Advertisement

अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला धोका?


अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला धोका?
SHARES

लोअर परळ - पालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नेहमीच प्रसिद्ध राहिलेली आहे. घोड्यांच्या शर्यतींसाठी प्रसिद्ध आणि इतिहासाला ही साक्ष देणारा धोबीघाट ही या परिसराची ओळख. या विकसनशील भागाचा शिवसेनेकडून योग्य ती कामे केलेली नाहीत. सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला शिवसैनिकांच्या अंतर्गत गटांमुळे सेनेच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे. सध्या आमदार सुनील शिंदे , वरळी विधानसभा अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचे असे शिवसेनिकांचे वेगवेगळे गट असल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एके काळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेस नेते भाऊराव पाटील यांनी या भागात अनेक वर्षे काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला होता. शरद दिघे, शरद कोरगावकर आदींनी त्यांची परंपरा जपली होती. मात्र कामगार नेते दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडीने ऐंशीच्या दशकात कॉंग्रेसला धूळ चारली होती. गिरणीकामगारांचे वर्चस्व असलेल्या या भागात विधानसभा निवडणुकीत कामगार आघाडीचे उमेदवार विजयी झाले. गिरणी संपानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि हळूहळू कामगार आघाडीची या परिसरावरील पकड सैल झाली. हळूहळू शिवसेनेचे या परिसरावर वर्चस्व वाढू लागले. मात्र सचिन अहिर यांच्या रुपात राष्ट्रवादीने मुसंडी मारत वरळीमध्ये शिवसेनेला पराभूत केले होते, परंतु मागील विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शिंदे यांच्या लोकप्रियतेमुळे शिवसेनेने पून्हा वरळीगड काबीज केला. मात्र सध्याच्या अंतर्गत वादामुळं या परिसरात शिवसेनेला धोका निर्माण झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा