रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा अवमान करणाऱ्या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रिपाइंतर्फे मंगळवारी सीएसटी येथील रेल्वे मुख्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. रामदास आठवले हे 2 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेसने सांगलीला दौ-यावर निघाले होते. त्यावेळी ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास एसी डब्बा असतानाही रेल्वे अधिका-यानी आठवलेंना प्रोटोकॉल तोडून सेकंड क्लास एसी डब्याचे आरक्षण देऊन अपमानित केले होते. त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर रेल प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, असे रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सो.ना. काबंळे यांनी सांगितले. यावेळी मध्य रेल्वेचे डीएमआर रवींद्र गोयल यांना एक निवेदन देण्यात आले.