Advertisement

लालबागचा 'नाना' भाजपात


SHARES

दादर - गुरूवार... हा दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. उमेदवारी अर्ज दाखल करायला एक दिवस बाकी असताना राजकीय घडामोडींना वेग आला. मात्र भाजपासाठी हा दिवस खास ठरला. त्याचं कारण आहे शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकाला गळाला लावण्यात भाजपाला यश आलं. विद्यमान नगरसेवक नाना आंबोले यांनी धनुष्यबाण सोडत हातात कमळ घेणं पसंत केलं.

नाना आंबोले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानं लालबाग-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला. पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने आंबोले नाराज झाले आणि त्यांनी थेट भाजपाचा रस्ता पकडला. विशेष म्हणजे नाना आंबोले यांच्यासोबत शिवसेनेच्या बबलू पांचाळ यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केलाय.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा