रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी उपयुक्त असलेल्या अॅम्बुलन्सचा सायरन आता 120 डेसिबलपर्यंत वाजणार आहे. ट्रॅफिकमधून मार्ग काढताना अॅम्बुलन्सना निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी अॅम्बुलन्सचा सायरन 110 ते 120 डेसिबलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना राज्यसरकारने काढली आहे. मात्र यामुळे अॅम्ब्युलन्समध्ये असलेल्या पेशंटला त्रास होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यभरात फिरणाऱ्या अॅम्बुलन्सना यापूर्वी ६५ ते ७५ डेसिबलपर्यंतच्या सायरनचा वापर करण्यास परवानगी होती. मात्र हा आवाज ट्रॅफिकमधील वाहनांच्या आवाजामुळे सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलिसांपर्यंत पोहोचणे कठीण होते. तो आवाज वाढवला जावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना आदित्य ठाकरे यांनी पत्र पाठवले होते. त्यानुसार 6 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे.
अॅम्बुलन्सचा सायरन ६५ ते १२० डेसिबल पर्यंत वाढवण्याचा माझा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे आणि त्याबाबत अधिसूचना काढली आहे. (१/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 5, 2017
आता आपल्या राज्यातील अॅम्बुलन्स सायरनची डेसिबल मर्यादा इतर आंतरराष्ट्रीय शहरांप्रमाणेच असेल.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 5, 2017
सरकारने 110 ते 120 डेसिबल पर्यंत सायरनची मर्यादा वाढवल्याने अॅम्बुलन्स कोणत्याही लेनमध्ये असो आणि सिग्नलपासून कितीही लांब अंतरावर असो, तिचा आवाज सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णलयात पोहोचणे शक्य होणार आहे.
दरम्यान, रुग्णावाहिकेवर मोठ्या आवाजात सायरन वाजवण्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
परदेशातील परिस्थिती आणि भारतातील परिस्थिती यात फरक आहे. शिवाय जर रुग्णवाहिकेवरच्या सायरनमधून 120 डेसिबल इतका आवाज आला, तर त्याचा त्रास रुग्णावाहिकेत असलेल्या पेशंटलाही होऊ शकतो.
सुमेरा अब्दुलाली, समन्ययक, आवाज फाऊंडेशन
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)