Advertisement

मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालणार, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप

पुढचं सरकार युतीचंच आणि पुढचा मुख्यमंत्री देखील मीच अशा दावा अत्यंत आत्मविश्वासाने करणारे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालणार, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप
SHARES

पुढचं सरकार युतीचंच आणि पुढचा मुख्यमंत्री देखील मीच अशा दावा अत्यंत आत्मविश्वासाने करणारे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. २०१४ सालच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात २ फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबत त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले.

मोठा धक्का

अॅड. सतीश उके यांनी याबाबत सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी दिलासा दिला होता. न्यायालयाच्या या आदेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात प्रचारसभा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं.  

काय आहे प्रकरण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात २ गुन्ह्याची माहिती लपवून खोटं प्रतिज्ञापत्र दिल्याचं उके यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. तसंच त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहे. त्यातील एक गुन्हा मानहानीचा तर दुसरा गुन्हा फसवणुकीचा आहे.  



हेही वाचा-

मी ब्ल्यू फिल्म बनवत नाही, राज ठाकरेंच्या उत्तराने हास्यकल्लोळ!

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा