मुंबई - स्वस्त दरातलं उत्कृष्ट दूध मुंबईकरांना देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ दूधविक्री केंद्रांनी पुढाकार घेतलाय. महिनाभरात मुंबईत १५० ठिकाणी स्वाभिमानी दूधविक्री केंद्रे सुरू होणार असून, हे दूध मुंबईकरांना प्रती लिटर ३२ ते ३५ रुपयांपर्यंत मिळणार आहे.
गाईचे भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळवून देत शेतकऱ्यांच्याही श्रमाला दाम मिळवून देण्याचा या मागचा हेतू आहे. बंद पडलेल्या दूध विक्री केंद्रांसह नव्या साखळी योजनांच्या माध्यमातून ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईकरांना गाईचे दूध ३२ रुपये प्रती लिटर दराने उपलब्ध होणार आहे. 'बचतगटांच्या सहकार्याने वितरकांची कडी काढून टाकली तर किंमती कमी करणं शक्य आहे', हा विश्वास स्वाभमिानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय.