Advertisement

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱ्या आणखी दोघांना कोरोना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी काम करणाऱ्या दोघाजणांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱ्या आणखी दोघांना कोरोना
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी काम करणाऱ्या दोघाजणांना कोरोनाची लागण (two workers of mns chief raj thackeray tested covid19 positive) झाल्याचं म्हटलं जात आहे. या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. अशा रितीने काेरोनाने राज ठाकरे यांच्या दारातून आता घरात प्रवेश केल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. या दोन्ही वाहन चालकांवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

या आधी राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी कृष्णकुंज निवासस्थानी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्या दोघांवरही तातडीने उपचार करण्यात आल्यावर त्यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर आता राज यांच्या घरातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

त्यातच दादर, शिवाजी पार्क येथील शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.


हेही वाचा -

चिंताजनक! राज ठाकरेंचे वाहन चालक निघाले कोरोना पाॅझिटिव्ह

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा