Advertisement

‘वंचित’ची १८० उमेदवारांची यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी १८० उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून वंचितने भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम शिरस्कर यांना मात्र वगळलं आहे.

‘वंचित’ची १८० उमेदवारांची यादी जाहीर
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी १८० उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून वंचितने भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम शिरस्कर यांना मात्र वगळलं आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेनेच्या पाठोपाठ वंचितने आपली यादी जाहीर केली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन १८० उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. उमेदवारांना तिकीट देताना वंचितने त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. 

‘अशी’ आहेत नावं:  

लक्ष्मण पवार (वडाळा ), आमीर इद्रिसी (सायन-कोळीवाडा), मनिषा जाधव (कलिना), विकास पवार (घाटकोपर.पूर्व), जालिंदर सरोदे (घाटकोपर .पश्चिम), अब्दूल हसन अली हसन खान (चांदीवली), शरद यटम (अंधेरी.पूर्व), प्रकाश कोकरे (अंधेरी.पश्चिम), सयीद सोहेल असगर रिझवी (मालाड.पश्चिम ), मोरीस केणी (चारकोप), सतीश जयसिंग माने (भांडूप.पश्चिम), सिद्धार्थ मोकळे (विक्रोळी), निखिल विनेरकर (बोरीवली), सलीम अब्बास खान (मिरा- भाईंदर), दीपा वळवी (नंदूरबार), प्रा. सुनीन दादा सुरवाडे (भुसावळ), शफी अब्दुल नवी शेख (जळगाव, शहर), उत्तम सपकाळे (जळगाव, ग्रामीण), मोरसिंग राठोड (चाळीसगाव), डॉ. तेजल काळे (बुलडाना), सविता मुंढे (सिंदखेड राजा), इम्रान पंजांनी (अकोला, पश्चिम), हरिभाऊ भदे (अकोला, पूर्व), आलीम वाहिद पटेल (अमरावती), आनंद उमाटे (वर्धा), राजेंद्र काकडे (कामठी), भोजराज बोंडे (रामटेक), अॅड. नितीन बोरकर (भंडारा), अशोक रामराव खरात (जालना), राजेंद्र मगरे (बदनापूर), दीपक बोराडे (भोकरदन), राजपालसिंग गाबरूसिंग राठोड (परतूर), शेख मोहम्मद गौस (परभणी), मुकुंद चावरे (नांदेड, उत्तर), नामदेव आईलवार (भोकर), गोपाळ मगरे (गडचिरोली)



हेही वाचा- 

कन्फर्म! आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार, स्वत:च केली घोषणा

२८८ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार- आंबेडकर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा