देशातील शेअर बाजारात (share market) आलेल्या तेजीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (sensex) ने गुरूवारी विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स ३८० अंकांनी वधारून ५२२३२ अंकावर बंद झाला. सेन्सेक्सचा हा आतापर्यंत उच्चांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (nifty) ११४ अंकांनी वाढून १५६९० वर बंद झाला.
आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी (gdp) मध्ये चांगली वाढ झाली आहे. तसंच दुसरीकडे देशात आता कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे देशातील शेअर बाजारात तेजी परतली आहे. गुरूवारी गुंतवणूकदारांनी रिलायन्स, बँका आणि वित्त संस्थाच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्सने विक्रमी पातळी गाठली.
गुरूवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी एक लाख कोटींची कमाई केली. सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर्स वधारले. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), कोटक बँक, एचडीएफसी बँक, टायटन, ऍक्सिस बँक या शेअर्सनी चांगली वाढ नोंदवली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर , डॉ. रेड्डीज लॅब, नेस्ले, टेक महिंद्रा आणि बजाज ऑटो या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
निफ्टी रियल्टी निर्देशांकात फिनिक्स मिल्स, प्रेस्टीज इस्टेट, ओमेक्स, डीएलएफ आणि शोभा या शेअरमध्ये वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत ९९६ कोटींचा नफा कमावणाऱ्या मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये ९ टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा -