Advertisement

मुंबईत लवकरच उबेरची पेट कॅब सेवा सुरू होणार

बेंगळुरूमध्ये उबेर पेट कॅब सेवा यशस्वीपणे सुरू केल्यानंतर मुंबईत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत लवकरच उबेरची पेट कॅब सेवा सुरू होणार
SHARES

उबेर मुंबईत त्यांची पेट कॅब सेवा लाँच करत आहे. कंपनीने जाहीर केले की, पाळीव प्राण्यांचे पालक आता उबेर कॅबमध्ये प्रवास करताना त्यांच्या पाळीव प्राण्यांना सोबत आणू शकतात. गेल्या वर्षी बेंगळुरूमध्ये उबेर पेट सेवा यशस्वीपणे सुरू केल्यानंतर मुंबईत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

प्रवासादरम्यान आता कॅबमध्ये कुत्रे आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना परवानगी दिली जाईल. पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी प्रवासाचे पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी उबर पेट सेवा सुरुवातीला बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली होती.

प्रवासी आगाऊ कॅब बुकिंग करू शकतात. या सेवेमुळे, पाळीव प्राण्यांच्या पालकांना यापुढे त्यांचे पाळीव प्राणी घरी सोडण्याची गरज नाही.

उबेर इंडिया आणि दक्षिण आशियातील रायडर व्हर्टिकलच्या प्रमुख श्वेता मंत्री म्हणाल्या, “आम्ही आता उबर पेट ऑन-डिमांड बुक करण्याचा पर्याय देत आहोत. यामुळे तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणे नेहमीपेक्षा सोपे होईल. Uber Pet सह, कुत्रे, मांजरी आणि इतर पाळीव प्राणी आता तुमच्या राईडमध्ये सामील होऊ शकतात."

Advertisement

पाळीव प्राण्यांच्या पालकांचे जीवन सोपे बनवणे हे उबेर इंडियाचे उद्दिष्ट आहे जेणेकरुन ते Uber च्या मदतीने त्यांचे पाळीव प्राणी सर्वत्र घेऊन जाऊ शकतील. आता मुंबईत उबेर पेट सेवा सुरू झाल्याने ते आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सोयीस्करपणे प्रवास करू शकतील.

उबेर पेट बुक कसे करावे?

● Uber ॲप उघडा आणि कुठे जायचे आहे ते स्थळ निवडा.

● स्क्रीनच्या तळाशी Uber Pet निवडा

● बुकिंग केलेली माहिती पुन्हा चेक करा आणि बुकिंगवर टॅप करा

● आता तुम्ही राइडचा आनंद घेऊ शकता



हेही वाचा

Advertisement

महाराष्ट्रात वंतारासारखे वन्यजीव अभयारण्य उभारण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा