Advertisement

महिलांसाठी खास लघुपट महोत्सव


महिलांसाठी खास लघुपट महोत्सव
SHARES

एखादा चित्रपट किंवा लघूपट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दिग्दर्शकांची यादी उभी राहते. बहूतेककरून पुरूष दिग्दर्शकांची यादी मोठी आहे. सुमित्रा भावे, समृद्धी पोरे यांसारख्या काही मोजक्या महिला दिग्दर्शक सोडल्या तर ही यादी फार काही मोठी नाही. अशाचकाही दिग्दर्शक होऊ पाहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सहित' संस्थेनं पुढाकार घेतला आहे. मुंबईबरोबरच भारतामध्ये महिला दिग्दर्शक तयार व्हाव्यात यासाठी खास लघूपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.


महोत्सव कुठे ?

गोव्यातील ‘सहित’ संस्थेनं प्रथमच आंतरराष्ट्रीयस्तरावरील लघुपट स्पर्धा आणि महोत्सवाचं आयोजन केलं आहे. हा महोत्सव गोव्यात पार पडणार असला तरी देश-विदेशातल्या विजेत्या महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग मुंबईत केलं जाणार आहे. जेणेकरून महिला दिग्दर्शकांचं नाव भारतभर होईल. अशा पद्धतीने महिला दिग्दर्शकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं हे पहिलंच वर्ष आहे.


देश-विदेशातील मुली-महिला मोठ्याप्रमाणात लघुपटांची निर्मिती करत आहेत. पण त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांसमोर ठळकपणे येत नाहीत. ही बाब निदर्शनास आल्यामुळेच आम्ही सदर महोत्सवाचे आयोजन करण्याचं ठरवलं आहे.
- किशोर शिंदे, व्यवस्थापक


या महिला होऊ शकतात सहभागी

या महोत्सवात कोणत्याही वयोगटातील मुली-महिला सहभाग घेऊ शकतात. १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१७ या काळात दिग्दर्शित केलेल्या कमाल ३० मिनिटांपर्यंतचे लघुपट आणि माहितीपट यांच्या प्रवेशिका स्वीकारल्या जातील.

अधिक माहितीसाठीwisffigoa@gmail.com इथे इमेल पाठवण्याचं, @wisffigoa या फेसबुक पेजला भेट देण्याचं किंवा ९४२३१५८३७०, ९१७२३६८१६८, ७८८७९४४६९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे.

Read this story in English or हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा