महिला पोलिस शिपाई सोनिया मोकल यांनी जागितक पोलिस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिस दलाचे नाव साता समुद्रापार गाजवले आहे. सोनियाने भारतीय महिला अॅथलेटिक्स संघातून 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तर 1500 मीटरमध्ये रजत पदक मिळवून शानदार कामगिरी केली आहे. अमेरिकेतल्या लॉस अँजेलिस येथे ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जागितक क्रीडा स्पर्धेत पोलिस दलात सोनिया मोकल यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सोनियाने महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत देखील याआधी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्यात तीने 800 मीटरमध्ये सुवर्ण पदक, 400 मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहेत. भारतीय क्रीडा पोलिस दलातील स्पर्धेत 800 मीटरमध्ये सुवर्ण पदक, 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये कांस्य पदक मिळवल्याने तीची निवड जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत करण्यात आली. या स्पर्धेत 80 देशांच्या एकूण 10,000 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा -
'या' पालिका कर्मचाऱ्याची बातच काही और!