जसविंदर कौर अाणि रुजुता मलिक यांच्या शानदार कामगिरीमुळे पश्चिम रेल्वेनं फ्रेंड्स स्पोर्टस क्लबचा ६-१ असा धुव्वा उडवत माउंट कार्मेल रिंक हाॅकी स्पर्धेच्या महिला गटाचं विजेतेपद पटकावलं. माउंट कार्मेल चर्चच्या कंपाउंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत जसविंदरनं पश्चिम रेल्वेला अाघाडी मिळवून देत तीन गोल झळकावले होते. त्यानंतर तिला चांगली साथ देताना रुजुतानेही पश्चिम रेल्वेच्या विजयात योगदान दिलं.
युवा खेळाडूंचा भरणा असलेला पण अनुभवाची शिदोरी पाठीशी नसतानाही फ्रेंडस क्लबच्या खेळाडूंनी पश्चिम रेल्वेला कडवी लढत दिली. गोल करण्याच्या अनेक संधी त्यांनी निर्माण केल्या. पण चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठवण्यात त्या अपयशी ठरल्या. रकिया शेख हिने एकमेव गोल केला.
फायनलमधील सर्वोत्तम खेळाडू - माधवी पाटील (फ्रेंड्स)
स्पर्धेतील सर्वोत्तम हाॅकीपटू - सोंगाय चानू (पश्चिम रेल्वे)
सर्वात उभरती खेळाडू - अल्थिया अल्मेडा (हाॅकी लव्हर्स)
सर्वोत्तम गोलकीपर - दीपिका मूर्ती (पश्चिम रेल्वे)
हेही वाचा -