Advertisement

Apple iPhone-12 सीरिज लाँच, जाणून घ्या फिचर्स


Apple iPhone-12 सीरिज लाँच, जाणून घ्या फिचर्स
SHARES

ॲपल आयफोनची 12वी (Apple iPhone-12) सीरिज आज लाँच झाली. कंपनीनं दोन नवीन आयपॅड आणि ॲपल वॉच आणल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत आयफोन १२ सीरिज बाजारात आणली आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणारा लाँच या वर्षी कोविड-19 मुळे थोडा उशिरानं झालं.

  • ॲपल आफोन दरवर्षी ग्राहकांचं इतकं लक्ष वेधून घेतो की आयफोन १२ बद्दल यंदा अफवासुद्धा तितक्याच ऐकायला मिळाल्या. या फोनची किंमत, डिझाईन, फिचर्स हे काही महिन्यांपूर्वीच लोकांना कळले आहेत.
  • आयफोन १२ मिनी हा सगळ्यात लहान आहे. आयफोन 12 मिनी-5.4 इंच स्क्रीन (iphone 12 mini), आयफोन 12-6.1 इंच स्क्रीन (iphone 12) , आयफोन 12 प्रो-6.1 इंच स्क्रीन (iphone 12 pro) , आयफोन 12 प्रो मॅक्स- 6.7 इंच स्क्रीन ही अशी सीरिज (iphone 12 pro Max) लाँच झाली.
  • आयफोन १२ मिनीची किंमत ही ६९९ डॉलर म्हणजेच ४७ हजार ५८६ रूपये इतकी आहे. आयफोन १२ ची किंमत ७९९ डॉलर म्हणजेच ५० हजार ४०० रुपये, आयफोन १२ प्रो ची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच ७३ हजार रुपये तसेच आयफोन १२ प्रो मॅक्सची किंमत १,०९९ डॉलर म्हणजेच ८० हजार ३४० रुपये आहे.
  • आयफोन १२ ला एक वेगळं आणि विशिष्ट डिझाईन देण्यात आलं आहे. आयफोन ६ सीरिज पासून कंपनी ही Curved डिझाइन्स जास्त बनवत नाही. म्हणूनच आयफोन ४ सारखं चपटं डिझाईन आयफोन १२ ला देण्यात आलं आहे.
  • आयफोन १२ सीरिजमध्ये कदाचित नवीन नेव्ही ब्लू आणि लाल रंग आहे. वेगवेगळ्या रंगांचे आयफोन काही नवीन नसले तरी आता आयफोन १२ मध्ये हे नवीन २ रंग पाहायला मिळणार आहेत.
  • ॲपलचे ISO १४ सोबत A१४ बायोनिक प्रोसेसर ही दोन नवीन वैशिष्ट्यं आहेत.
  • 64 जीबी ते 512 जीबी या सर्व प्रकारांत आयफोन उपलब्ध होणार आहे.
  • कॅमेराच्या बाबतीत काही गोष्टी या आयफोन ११ सारख्याच आहेत. तसंच आयफोन १२ मध्ये ड्युअल कॅमेरा युनिट मिळणार आहे. आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्समध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट मिळण्याची शक्यता आहे.
  • आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स यांना रिॲलिटी वैशिष्ट्ये जोडण्यासाठी डीप सेन्सिंग लीडर सेन्सर मिळणार आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा