Advertisement

‘नेबर्ली’ अ‍ॅपवर बनवा नवीन शेजारी


‘नेबर्ली’ अ‍ॅपवर बनवा नवीन शेजारी
SHARES

निंदकाचं घर असावं शेजारी, अशी म्हण मराठीत प्रचलित अाहे. पण सध्याच्या युगात अापल्या शेजारी कोण राहत अाहे, हेच अापल्याला ठाऊक नसतं. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अापल्या अासपासच्या परिसरातील लोकांशी संवाद साधण्याचा नवा पर्याय गुगलच्या ‘नेबर्ली’ अ‍ॅपनं दिला आहे. गुगलच्या नेक्स्ट बिलियन यूझर्स टीमनं गुरुवारी मुंबईमध्ये या अॅपचं उद्घाटन केलं.


सुरुवात मुंबईपासून

सुरुवातीला फक्त मुंबईतच या अॅपची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईसह कर्जत, विरार, पनवेलपर्यंतच्या भागात हे अॅप उपलब्ध असणार आहे. मुंबई खुप दूरवर पसरलेली असल्यानं रेल्वेमार्गापासून सुमारे ४० किलोमीटरचा परिसर यामध्ये सहभागी करण्यात आला आहे.


या सुविधा मिळतील?

घराजवळ चांगलं गार्डन कोणतं आहे? माझ्या मुलांसाठी चांगली शाळा कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या अॅपच्या माध्यमातून मिळवता येतील. या अॅपशी जोडले गेलेले एकाच परिसरातील लोकं एकमेकांशी संपर्क करू शकतील अथवा प्रश्न विचारू शकतील. परिसरातील लोकंच याची उत्तरं देतील. आपली कुठलीही वैयक्तिक माहिती देण्याची यात गरज नाही.


असा करा अॅपचा उपयोग

गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. नंतर आपल्या राहत्या ठिकाणासह आपली नोंदणी या अ‍ॅपमध्ये करावी लागणार आहे. स्थानिक लोकांकडून मार्गदर्शनदेखील घेण्याची सोय यामध्ये असणार आहे. आपल्या परिसरातील माहित नसलेल्या बाबी, वेगळी ठिकाणेही यामध्ये नोंदविता येणार आहेत. हे अ‍ॅप इंटरनेट नसले तरी वापरता येईल.



भारतातील मोठमोठी शहरं सतत बदलत असल्यामुळे साध्या प्रश्नांची उत्तरं मिळणंही कठीण असतं. म्हणून वेबवरील माहितीच्या अाधारे लोकांना जोडण्याचा एक नवीन पर्याय गुगलनं उपलब्ध केला अाहे. स्थानिकांना एकत्र आणून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी गुगलनं या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. जगभरात प्रथम मुंबईमध्ये हे अ‍ॅप सुरू केलं अाहे.
- जोश वुडवर्ड, ‘गुगल नेक्स्ट बिलियन यूझर्स टीम’चे उत्पादन व्यवस्थापक


हेही वाचा -

सारा तेंडुलकरच्या नावाचं खोटं अकाऊंट, एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक

इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ हवेत, मग डाऊनलोड करा 'हा' ॲप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा