Advertisement

१ डिसेंबरपासून सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धावणार एसी लोकल

हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता या प्रवाशांना एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे.

१ डिसेंबरपासून सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धावणार एसी लोकल
Image used for representation
SHARES

हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता या प्रवाशांना एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर १ डिसेंबरपासून एसी लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

हार्बर मार्गावर एसी लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होणार आहेत. सामान्य लोकलच्या १२ फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. याशिवाय मध्य रेल्वेने हार्बरवरील काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केले असून त्यानुसार गोरेगाव व पनवेल प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.

प्रथमच गोरेगाव ते पनवेल लोकलही सोडल्या जाणार आहेत. त्याच्या १८ फेऱ्या १ डिसेंबरपासून होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. हार्बरवर अंधेरीपर्यंत होणाऱ्या लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. अशा ४४ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.

वेळापत्रक : 

अप मार्ग

  • वाशी-सीएसएमटी- स. ४.२५.
  • पनवेल -सीएसएमटी- स. ६.४५
  • पनवेल -सीएसएमटी- स. ९.४०
  • पनवेल -सीएसएमटी- दु. १२.४१
  • पनवेल -सीएसएमटी- दु. ३.४५
  • पनवेल -सीएसएमटी- सायं. ६.३७

डाऊन मार्ग

  • सीएसएमटी -पनवेल- स. ५.१८
  • सीएसएमटी-पनवेल- स .८.०८
  • सीएसएमटी – पनवेल- स. ११.०४
  • सीएसएमटी- पनवेल- दु. २.१२
  • सीएसएमटी -पनवेल- सायं. ५.०८
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा