मध्य रेल्वेने कामांचा जोरदार सपाटा लावला असून गुरुवारी १८ जानेवारी रोजी अांबिवली स्थानकातील पूलाच्या गर्डरसाठी ५ तासांचा ट्रॅफिक अाणि पाॅवरब्लाॅक घेण्यात येणार अाहे. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लाॅक असणार अाहे. अांबिवली ते अासनगाव स्थानकांदरम्यान हा ब्लाॅक असेल. अांबिवली स्थानकांत ३.७५९ मीटर अरुंद पुलाच्या कामासाठी २ स्टील गर्डर लावण्यासाठी अप आणि डाऊन मार्गावर ५ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपति शिवाजी महराज टर्मिनसहून टिटवाळा/आसनगांव/कसाऱ्यासाठी सुटणाऱ्या डाऊन उपनगरीय सेवा सकाळी ९.१२ वाजल्यापासून १३.३९ पर्यंत आणि कसारा/आसनगांव/टिटवाळ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उपनगरीय सेवा ०९.५४ ते १५.०२ वाजेपर्यंत रद्द केल्या जाणार आहेत. काही मेल एक्स्प्रेसही रद्द करण्यात येणार आहेत. यादरम्यान, लांब पल्ल्याच्या काही गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.