सोमवारी साजरा होणाऱ्या ईद निमित्त वाहतुकीत आणि बस मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शहरातील ईद उत्सवाचा भाग म्हणून अनेक रस्त्यांवर लागू करण्यात आलेले निर्बंध लक्षात घेऊन बेस्टने अनेक बस मार्ग वळवले आहेत.
ईदच्या सणानिमित्त धारावीतील 90 फुटी रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मार्ग 176, आणि 463 पहाटे 5.00 वाजल्यापासून सायन हॉस्पिटल - कुंभार वाडा मार्गे दोन्ही दिशेने वळवले आहेत.
तसेच टागोर नगर क्र. 1, ईद साजरी करण्यासाठी रस्ताही बंद आहे. 185 आणि 453 या मार्गाच्या बसेस सकाळी 05.45 वाजेपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे - लिंक रोड - गांधी नगर मार्गे दोन्ही दिशेने वळवण्यात आल्या आहेत.
याशिवाय बकरी ईदनिमित्त 357, 375, 376, 377, 380 या मार्गाच्या बसेस केडी जंक्शन ते तानाजी मालुसरे चौक (गोवंडी स्टेशन रोड) दरम्यान जिजामाता भोसले मार्गे-बायंगण माळजुंना वाडी मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त, मार्ग 220 आणि 222 हे पहाटे 6.30 पासून वांद्रे तलावाऐवजी लिंकिंग रोड - मोती महल (422 मार्गे) मार्गे वळवले आहेत.
वालावलकर मार्गाव्यतिरिक्त, गोरेगाव इथे देखील ईदनिमित्त वाहतिकीत बदल करण्यात आले आहेत. मार्ग क्रमांक 235 आणि 242 च्या बसेस सकाळी 07.30 पासून मौलाना झियाउद्दीन मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
बेस्टच्या म्हणण्यानुसार मालवणीतील अब्दुल हमीद मार्ग ‘नमाज’साठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मार्ग 180,207,241,256,273,359, आणि 459 सकाळी 8.00 पासून चुन्नीलाल गिरधारीलाल मार्गाने वळवले आहेत.
हेही वाचा