Advertisement

महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्टच्या जादा बसेस

दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात मुंबई शहरात 'महालक्ष्मी यात्रा' काढण्यात येणार असून, ही यात्रा 3 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्टच्या जादा बसेस
SHARES

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर महिन्यात मुंबई (mumbai) शहरात 'महालक्ष्मी यात्रा' काढण्यात येणार आहे. ही यात्रा 3 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

महालक्ष्मी यात्रेदरम्यान महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भायखळा, महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथून मुंबई उपनगरांदरम्यान बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच महालक्ष्मीच्या दर्शनासाठी विशेष बसेस सोडण्यात (extra bus) येणार आहेत.

आवश्यकतेनुसार शहराच्या विविध भागातून महालक्ष्मी मंदिरामार्गे धावणाऱ्या बससेवांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी बहुतेक भायखळा स्थानक आणि महालक्ष्मी स्थानकावरून सामान्य बसने येतात आणि तेथून ते बेस्ट (best) बस सेवा वापरतात.

त्यामुळे भायखळा, महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर दरम्यान या मार्गावर बेस्ट उपक्रमाच्या अधिकाधिक बसेस धावणार आहेत. भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी बसस्थानकावर बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी नेमण्यात येणार आहेत.

महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्ट बस मार्ग 37, 57, 151, A-63, A-77, A-77 विशेष, A-357, 83 वर दररोज 23 जादा बसेस चालवल्या जातील.

याशिवाय, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत लोकल प्रवाशांसाठी विशेष बस सेवा चालवली जाईल.

तसेच लालबाग, चिंचपोकळी आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकामार्गे गर्दीच्या वेळेत बसेस चालवल्या जातील.

महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विशेष बससेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती बेस्ट प्रशासनाने केली आहे.



हेही वाचा

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी

MMR मधील SRA प्रकल्पांसाठी केंद्रीय एजन्सींना सामील करणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा