वांद्रे येथे होणाऱ्या माऊंटमेरीच्या जत्रेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईतील विविध भागातून तसेच वांद्रे बसस्थानक (पश्चिम) ते हिलरोड (मेहबूब स्टुडिओ) पर्यंत जादा बस सोडण्यात येणार आहेत. माऊंट मेरीच्या जत्रेवेळी ख्रिश्चन बांधवांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेत बेस्टनं जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कधी ते कधीपर्यंत?
रविवार ९ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान या जादा बस सोडण्यात येणार आहे. माऊंटमेरी जत्रेच्या कालावधीत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टतर्फे सकाळी आणि संध्याकाळी जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहे.
जादा बसगाड्या
- रविवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी २५ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी २३ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- सोमवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १२ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी १२ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- मंगळवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १२ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी १२ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- बुधवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १७ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी २१ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- गुरुवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १२ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी १२ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- शुक्रवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १७ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी २१ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- शनिवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी २८ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी २८ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.
- रविवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ४२ बसगाड्या सोडण्यात येतील, तर संध्याकाळी ५२ बसगाड्या सोडण्यात येणार आहे.