Advertisement

गोरेगाव-कांदिवली दरम्यान 23 आणि 24 सप्टेंबरला ब्लॉक

गोरेगाव-कांदिवली मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने 23 ते 24 सप्टेंबर दरम्यान 5व्या आणि अप जलद मार्गांवर 6.30 तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे.

गोरेगाव-कांदिवली दरम्यान 23 आणि 24 सप्टेंबरला ब्लॉक
SHARES

गोरेगाव आणि कांदिवली (kandivali) स्थानकादरम्यान 6 व्या रेल्वे मार्गिकेचे काम चालू आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 5 वी मार्गिका आणि अप फास्ट लाइनवर ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक तब्बल 6.30 तासांचा असणार आहे.

सोमवार, 23 सप्टेंबर रात्री 11:00 ते मंगळवार, 24 सप्टेंबर सकाळी 5:30 वाजता हा ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वेचे (western railways) मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, सर्व अप फास्ट लाइनवरील उपनगरीय रेल्वे गाड्यांना बोरीवली आणि अंधेरी च्या मध्यरात्री 11:00 ते पहाटे 3:30 वाजेपर्यंत अप स्लो लाइनवर वळवण्यात होईल. 

ब्लॉकच्या दरम्यान अनेक उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. तसेच अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉक (mega block) कालावधीत अनेक उपनगरीय गाड्या शॉर्ट-टर्म केल्या जातील. 

पश्चिम रेल्वेच्या म्हण्ण्यानुसार, 23 सप्टेंबर, 2024 रोजी चर्चगेटहून रात्री 10:24 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरीवली लोकल मालाड पर्यंतच धावेल.

अंधेरी-भाईंदर ट्रेन

23 सप्टेंबर, 2024 रोजी अंधेरीहून 11:55 वाजता सुटणारी अंधेरी-भाईंदर फास्ट एसी लोकल रात्री 11:25 वाजता बोरीवलीहून सुटेल. तसेच 24 सप्टेंबर, 2024 रोजी बांद्र्याहून सकाळी 04:05 वाजता सुटणारी बांद्रा-बोरीवली लोकल गोरेगाव पर्यंत धावेल. 


बोरीवली-विरार ट्रेन

24 सप्टेंबर, 2024 रोजी बोरीवलीहून (borivali) सकाळी 08:12 वाजता सुटणारी बोरीवली-विरार लोकल नालासोपारा पर्यंत धावेल. 24 सप्टेंबर, 2024 रोजी विरारहून सकाळी 09:05 वाजता सुटणारी विरार-बोरीवली धीमी लोकल बोरीवली-अंधेरी-बांद्रा-दादर-मुंबई (mumbai) सेंट्रल या स्थानकादरम्यान जलद धावेल.



हेही वाचा

मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 हून अधिक बूथ कार्यरत

1 ऑक्टोबरपासून एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा